धिरज लिंगाडेंच्या प्रचारार्थ बुलडाण्यात महाविकास आघाडीची सभा दणक्यात! आ.डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन चुनावी जुमला; माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल;
विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ काल,२३ जानेवारीच्या सायंकाळी स्थानिक गर्दे सभागृहात संयुक्त सभेचे आयोजन केले होते, त्यावेळी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे बोलत होते. यावेळी मंचावर अ. भा. काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, दिलिप जाधव, ॲड साहेबराव सरदार, राकाँ. जिल्हाध्यक्ष ॲड . नाझेर काझी, नरेश शेळके, सौ. जयश्री शेळके, दत्तात्रय लहाने, बाबासाहेब भोंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजपाच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवतांना विधानपरिषदेची निवडणूक ही पूर्वी शिक्षक व पदवीधरांच्या संघटना लढवत, पण आता त्या राजकीय झाल्याचे सांगितले.
आमदाराचे कार्यालय वाटते गुंडाची गुहा -माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार हल्लाबोल..
आमदाराचे जनसंपर्क कार्यालय ही गुंडाची गुहा वाटते, काल ४ ते ५ शासकीय अधिकारी त्यांच्या कार्यालयातून उतरल्यानंतर थेट माझ्या घरी पाणी प्यायला आले.. त्यावेळी त्यांनी हा अनुभव सांगितला. जीव मुठीत धरुन त्या कार्यालयात गेलो होतो, असे ते म्हणाल्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगून विद्यमान आमदाराची गुंडागर्दी संपविण्यासाठी सज्जन व सुसंस्कृत असणाऱ्या धिरज लिंगाडे यांना आमदार म्हणून विजयी करा, असे आवाहन केले. पूर्वीच्या कोणत्याही आमदाराकडे गेलेतर त्याच्याशी सौजन्याने वागले जायचे, आता ती परिस्थिती राहिली नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगून.. आता जर आमदाराला फोन केलातर तिकडून केव्हा शिवी येईल, याचा नेम नसतो.. असाही हल्ला त्यांनी आमदारांचे नाव न घेता चढविला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विकास खंडागळे, जुनी पेन्शन हक्क समितीचे प्रा.विलास बनसोड व प्रा.भागवत धंदर, बेरोजगार पदवीधर संघटनेचे महेंद्र कड, शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप दांदडे यांच्यासह आयएमए. चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बेदमुथा उपस्थित होते. यावेळी अनेकांनी भाषणेही केली. ॲड विजय साळवे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य कोठे सर यांचीही यावेळी उपस्थिती होती. आयोजन दत्ता काकस, अनिल बावस्कर, हेमंत खेडेकर, सुनिल तायडे, डी. एस. लहाने व लखन गाडेकर यांनी केले होते. प्रास्ताविक प्रा. संतोष आंबेकर यांनी तर सुत्रसंचलन प्रा. सुनिल सपकाळ व आभार प्रदर्शन प्रा. डी. एस. लहाने यांनी केले.