महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् खासदार प्रतापराव जाधवांचे मुख्यमंत्री एकनाथ खडसे...

 
jadhav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आता बातमीच हेडिंग वाचून तुमचे डोके चक्रावून गेले असेलच..जाईलच ना हो.. असं कस होऊ शकत अस तुम्हालाही वाटनचं की...पण हो खरंय ते! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी आपल्या बुलडाण्याचे लाडके खासदार प्रतापराव जाधव यांचे मुख्यमंत्री एकनाथ खडसे हाय! खुद्द त्यांनीच तशी कबुली दिलीय..दिल्लीत एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ खडसे असा उल्लेख केलाय..!

खडसे साहेब तसे बुलडाण्याच्या बॉण्ड्रीला लागूनच. त्यामुळेच कदाचित जाधव सायबांचे खडसे सायबांवर प्रेम असेल म्हणा..! तर त्याचे झाले असे की जाधव साहेब दिल्लीत असताना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना गाठले.. खासदार प्रतापराव जाधवांचे धाकटे बंधू संजय जाधवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलेल्या जाहिरातीबद्दल त्यांना विचारले..

त्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेकांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले..मात्र हे सांगताना चुकून त्यांच्या तोडून मुख्यमंत्री एकनाथ खडसे असा उल्लेख झालाय..आता तो चुकून झाला की पोटातलं ओठावर आल हे त्यांचं  त्यानांच ठाऊक! पण त्याचवेळी संजय जाधव हे त्यांचा निर्णय घेण्यास मोकळे आहेत असेही खा. जाधव यांनी सांगितले.