आमदार श्वेताताईंनी पीक विमा नुकसान भरपाईचे क्षेत्र वाढवून घेतले! शेतकरी संघटनेचे नेते समाधान कणखर यांचे प्रतिपादन; तुपकरांच्या एल्गार मोर्चाला म्हणाले नौटंकी..
( जाहिरात👆🏻 )
केंद्र सरकारने तेल बियांवरील स्टॉक लिमिट हटवल्याने सोयाबीनचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे.हे कुठल्या मोर्चाने झाले नाही. मात्र काही लोक झालेली भाववाढ एल्गार मोर्चाने होत असल्याच्या वल्गना करीत आहेत. भाववाढ हे मोदी सरकारचे यश असून एल्गार मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याची टीका यावेळी कणखर यांनी केली.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने एनडीआरएफ च्या निकषात तीन पट वाढ केली. तसेच नुकसान भरपाई साठी दोन हेक्टर वरून तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी राज्यातील अनेक शेतकरी पात्र होणार असल्याचे कणखर म्हणाले.
अमडापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करणार..
अमडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. परंतु चौकाचे सौंदर्यीकरण झालेले नाही. मागच्या काही लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली मात्र सौंदर्यीकरणाचे काम केले नाही. मात्र आता आमदार निधीतून या चौकाचे सौंदर्यीकरण करणार असल्याची घोषणा आमदार श्वेताताईंनी यावेळी केली. या कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख यांच्यासह गावातील नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.