आमदार श्वेताताईंचा राहुल गांधी अन् राहुल बोंद्रेंवर हल्लाबोल! म्हणाल्या, एक राहुल शेतकरी आत्महत्यांविषयी बोलतो, दुसरा राहुल शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेचे ६२ कोटी

थकवून शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरतो, दोघेही हूल देण्यात एक्स्पर्ट..
 

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधींची यात्रा काल, १८ नोव्हेंबरपासून बुलडाणा जिल्ह्यात आहे. काल, शेगावच्या सभेला खा. राहुल गांधींनी संबोधित केले. दरम्यान चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी ट्विटर च्या माध्यमातून राहुल गांधी आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर हल्ला चढवला आहे. दोघेही हुल देण्यात एक्स्पर्ट आहेत. संत गजानन महाराजांना तुमची खोटी स्क्रिप्ट रुचणार नाही असे आमदार श्वेताताईंनी म्हटले आहे.

 "एक राहुल शेतकरी आत्महत्यांविषयी बोलतो, दुसरा  राहुल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष,शेतकऱ्यांची जिल्हा बँक ६२ कोटी नी थकवतो व शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरतो. दोघेही हुल देण्यात एक्स्पर्ट. राहुल बाबा , ही संत श्रेष्ठ गजानन महाराजांची नगरी आहे. तुमची खोटी स्क्रिप्ट महाराजांना रुचणार नाही, बर का..!" असे ट्विट आमदार श्वेताताई महाले यांनी केले आहे.