आमदार संजय गायकवाड म्हणतात,बुलडाणा मतदारसंघातील इंच इंच जमीन पाण्याखाली आणायचीय! सिंचनासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर; डोंगरखंडाळ्याला स्पेशल गिफ्ट! वाचा कोणत्या गावासाठी किती निधी..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा आणि  मोताळा तालुक्यातील  शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा. मोताळा तालुक्याला लागलेला दुष्काळग्रस्त तालुक्याचा कलंक  कायमचा संपावा यासाठी या भागातील इंच इंच जमीन पाण्याखाली आणण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांचे प्रयत्न सुरू आहेत. बुलडाणा मतदारसंघातील सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली पाहिजे यासाठी नियोजनबध्द आराखडा करून आमदार गायकवाड यांच्या प्रयत्नातून आधी १७ कोटी व आता २७ कोटी असा एकूण ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

बुलडाणा व मोताळा तालुक्यात  एकूण १० द्वार युक्त सिमेंट बंधारे व सात पाझर तलाव मंजूर करण्यात आले आहे. यापैकी ४ पाझर तलाव हे एकट्या डोंगरखंडाळा येथे होणार आहे. त्यामुळे बुलडाणा मतदारसंघातील चारशे ते पाचशे हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या कामासाठी आमदार गायकवाड यांनी महाराष्ट्र जलसंधारण मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश म्हणून ९ मे रोजी शासनाने द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे व पाझर तलाव योजनेस मान्यता दिली व २८ कोटी ८६ लाख १८ हजार ५४५ रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर केला.
 

 असा निधी,अशी कामे
बुलडाणा तालुक्यातील खुपगाव  येथे  अंदाजित रक्कम १ कोटी ७२लाख ११ हजार ००७ रुपयाच्या माध्यमातून बंधारा होणार आहे. या बंधाऱ्यातून ३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.   पळसखेड नागो येथे १ कोटी ७३ लाख २० हजार २३७ रुपये. या बंधाऱ्यातून ३१ हेक्टर सिंचन होणार आहे.  जनुना क्रमांक १ येथे १ कोटी १८ लाख ४७ हजार ३८०रुपयाचा बंधारा त्यातून १८ हेक्टर सिंचन.   शेलगाव येथे  १कोटी ५१ लाख २७ हजार ५०३ रुपये खर्चून बांधारा, सिंचन क्षेत्र २८हेक्टर. चार्वदा येथे १ कोटी ४९ लाख ८४ हजार १९ रुपयांचा बांधारा ,सिंचन क्षेत्र  २७ हेक्टर. पिंपरी गवळी क्रमांक एक येथे  १ कोटी ५५ लाख २ हजार ३६९ रुपयाचा बांधारा, सिंचन क्षेत्र २८हेक्टर.  पिंपरी गवळी क्रमांक दोन येथे  १ कोटी ५३ लाख ६१ हजार ९०८ रुपयाचा बांधारा, सिंचन क्षेत्र २८ हेक्टर.  पिंपरी गवळी क्रमांक तीन  येथे  १ कोटी ४६ लाख ८० हजार ९३ रुपयाचा बांधारा,  सिंचन क्षेत्र २७ हेक्टर.  मोहेगाव येथे  १ कोटी ६६ लाख ७८ हजार ८८ रुपयाचा बांधारा, सिंचन क्षेत्र ३१ हेक्टर. गिरोली क्रमांक २ येथे १ कोटी ६१ लाख ७५ हजार ४२५  रुपयाचा बांधारा, सिंचन ३१ हेक्टर. हथेडी क्रमांक एक येथे  १ कोटी ७१ लाख ८ हजार ७१५ रुपयांचा पाझर तालाव योजना,  सिंचन १८ हेक्टर. डोंगर खंडाळा क्रमांक एक येथे १ कोटी ९८ लाख २४ हजार ५०० रुपयाचा पाझर तालाव, सिंचन क्षेत्र २५ हेक्टर.  डोंगर खंडाळा क्रमांक  दोन  येथे २  कोटी २७ लाख ८ हजार १०० रुपयाचा पाझर तालाव, सिंचन २२हेक्टर. डोंगर खंडाळा क्रमांक ३ येथे १ कोटी ९९ लाख ७९ हजार ४५४ रुपयाचा पाझर तालाव, सिंचन २२ हेक्टर, डोंगर खंडाळा क्रमांक चार  येथे  २ कोटी १३ लाख ८१ हजाराचा पाझर तलाव सिंचन २२ हेक्टर,  सावळा क्रमांक एक येथे १ कोटी ८४  लाख ३७ हजार ६०० रुपयांचा पाझर तालाव,  सिंचन २२ हेक्टर,  सावळा क्रमांक दोन येथे १ कोटी ८० लाख ६७ हजार १०० रुपयाचा पाझर तालाव, सिंचन, २३ हेक्टर. या सर्व बांधाची एकूण साठवण क्षमता १५६५.५२ स.घ.मी. असून नियोजित सिंचनक्षमता ४३७ हेक्‍टर इतकी राहणार आहे.