आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने धाड परिसरात विकास पर्व सुरू

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहा वर्षे चिखली मतदारसंघातील नागरिक रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले. सौ. श्वेताताई महाले पाटील आमदार झाल्यापासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध शासकीय योजनांतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवीन पर्व सुरू झाल्याचे दिसत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव यांनी धाड परिसरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

आज, २६ फेब्रुवारीला आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर बोरखेड ,बोदेगाव, चांडोळ या रस्ता कामांच्या भूमिपूजन प्रसंगी श्री. जाधव बोलत होते. आमदार सौ. श्वेताताई महाले या लोकांमध्ये जाऊन काम करीत असून, प्रत्येक मतदाराच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पायाला भिंगरी लावून त्या लोकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देत आहे.

सुख- दुःखात सहभागी नागरिकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील हे सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून नागरिक त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत असल्याचे  भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी म्हणाले. यावेळी श्रीरंग अण्णा एन्डोले (जिल्हा कार्यकािरणी सदस्य), योगेश राजपूत (युवा मोर्चा अध्यक्ष), गजानन देशमुख (तालुका उपाध्यक्ष भाजपा), राजू चांदा, तेजराव पाटील जाधव, विठोबा तायडे, बबनराव सुसर, प्रताप शेठ मेहर, शकील सौदागर, टीका खान, सोहेल सौदागर, खलील खाँ, गजानन सपकाळ, भगवान मर्कट, धनंजय राऊत, दीपक राजपूत, यशवंत सोनुने, सखाराम नेमाडे, सुनिल पिंपळे, जयेश पडोळ, सुनील देशमुख, अरुण भोंडे, पुरुषोत्तम भोंडे, संतोष पालकर, रामचंद्र खांडवे, भिका खांडवे, सारंगधर बावस्कर, माणिकराव खांडवे, संजय धनावत यांच्यासह गावकरी उपस्थित होते.