आमदार गायकवाडांचे पर्जन्यमापकाच्या चुकीवर बोट! हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टीची धग!
मोताळा आणि बुलढाणा तालुक्यामध्ये २४ तासात मध्ये रात्री १२ ते सकाळी १२ या वेळेमध्ये जवळपास ५५ मिलिमीटर पाऊस पडलाय.तसेच यामध्ये ०२ तासाचा खंड पडून पुन्हा रात्री त्या ठिकाणी ४३ मिलिमीटर पाऊस पडला.मात्र यावर अधिकाऱ्याचे म्हणणे पडले की, याची नोंद २४ तासांमध्ये फक्त ६५ मीटर झालेली असल्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांना मदत देता येत नाही.
परंतु २ तासाचा खंड धरला तर जवळपास तो ९८ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.आणि म्हणून ते निकषात बसत नाही. या संदर्भात काही उपाययोजना शासनातर्फे करण्यात येणार आहे का? असा प्रश्न आ. संजय गायकवाड यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना ना. शंभूराजे देसाई यांनी जो पाऊस ६५ मिलिमीटर नाही.परंतु सततचा पाऊस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे.याचे सुद्धा याद्या आपण मागितलेले आहेत. तसेच याचे निकष तयार करण्यासाठी प्रधान सचिव नियोजन यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात आलेली आहे. ती समिती जे निकष निश्चित करेल ते तपासून घेतली जातील आणि त्या निकषांमध्ये जर हे सर्व बसत असतील तर त्यांचा विचार नक्की केला जाईल असे ते म्हणाले.