आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्याच्या अन् देशाच्या दृष्टीने योग्य नाही! राज्यपालांबद्दल म्हणाले, आता....
Updated: Dec 13, 2022, 19:41 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी दोन-तीन वेळा दिलगिरी देखील व्यक्त केली आहे, त्यामुळे आता हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे, असं मत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, महामानवांच्या विरोधात बोलणाऱ्या विरुद्ध कारवाईसाठी कायदा करण्यात यावा, या विषयावर बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांचा माइक बंद करण्यात आला, त्यावर विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जो राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने योग्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
राज्यपाल यांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता,डॉ.शिंगणे म्हणाले की, राज्यपाल हे विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रात आले, तो विचार महाराष्ट्राच्या हिताचा नसून, त्यांची महाराष्ट्रातून आता जाण्याची वेळ आली हे लक्षात आल्यानेच राज्यपालांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं असाव असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.