आमदार आकाश फुंडकर म्हणाले, सानंदा अशिक्षित माणूस; "या" कारणामुळे होतेय सानंदांची चिडचिड!

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महात्मा ज्योतिबा फुलेनीं समतेचा, बंधुत्वाचा आणि शिक्षणाचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त राजकीय मतभेद बाजूला ठेवून ज्ञानेश्वर पाटील आणि मी एकत्र आलो, मिरवणुकीत सहभाग घेतला.  मात्र अशिक्षित असलेल्या व्यक्तीला हे कळणार नाही हे मला माहीत होते. त्यामुळे माजी आमदार सानंदा यांच्याकडून होत असलेल्या आरोपांचे मला फारसे आश्चर्य वाटले नाही अशी प्रतिक्रिया आमदार आकाश फुंडकर यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना दिली.

खामगाव काँग्रेसमध्ये आता ज्ञानेश्वर पाटलांचे वजन वाढत आहे. ते आले की काँग्रेसचे कार्यकर्ते गोळा होतात. खुनशी स्वभावाच्या सानंदांना हे सहन होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सानंदांनी दबावाचे, दादागिरीचे राजकारण केले. महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय संस्कृतीची त्यांना जाण नाही म्हणून ते असले वक्तव्य करतात असे आकाश फुंडकर म्हणाले. मी आणि नाना एकत्र दिसल्याने अनेकांना झाला. बदल्याचे,सुडाचे आणि खुनशीचे राजकारण संपुष्टात यावे. विकासात्मक कामांसाठी राजकीय मतभेद विसरून  एकत्र येणे यात काहीही गैर नाही.

मात्र ज्ञानेश्वर पाटील यांनी आता खामगावात घर घेतल्याचे ऐकले आहे . खामगावातल्या  मतदार यादीत आता ज्ञानेश्वर पाटलांचे नाव आहे . त्यामुळे राजकीय अस्तित्वाची भीती सानंदांना वाटत असल्याचे आमदार फुंडकर म्हणाले. खामगाव काँग्रेसमध्ये आता सानंदाच्या मागे  कुणी राहिले नाही मात्र ज्ञानेश्वर पाटलांची फॅन फॉलोविंग खामगाव काँग्रेसमध्ये वाढत आहे त्यामुळे सानंदांची चिडचिड होत आहे. त्यांचे दुखणे भलतेच आहे असेही आमदार आकाश फुंडकर म्हणाले.