लव्ह जिहाद, गोवंश तस्करीविरोधात सकल हिंदू समाजाचा बुलडाण्यात जनआक्रोश!२ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केली जात असताना,महाराष्ट्र राज्यात हिंदुत्ववादी संघटनेचा आक्रोश वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हा निहाय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बुलडाणा येथेही २ जानेवारीला जन आक्रोश मोर्चाच्या आयोजना संदर्भात येथील विश्रामगृहात रविवारी बैठक घेण्यात आली.
महापुरुषांच्या संदर्भात नेत्यांनी अवमानकारक वक्तव्य करू नये, यासाठी कायदा करण्यात यावा. अशी आग्रही मागणी रेटण्यात येणार आहे. शिवाय गोवंश तस्करी, लव्ह जिहाद व हिंदू धर्मावरील अन्याय अत्याचार विरोधातील न्यायिक मागणीसह हिंदू धर्माला शासनाने रक्षण देण्याची मागणी करण्यात येणार आहे. सकल हिंदू समाजाचा हा मोर्चा येथील संगम चौकातून जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी असणार आहेत. सकल हिंदू समाजाच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन हिंदुराष्ट्र सेनाचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजेश पिंगळे,राजेश हेलगे, किरण राजेंद्र अहिरे, केशव बेंडवाल, गजेंद्र पवार यासह विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी त्यांनी केले आहे.