काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून कासम गवळी यांचा पत्ता कट? भ्रष्टाचाराचे दोन गुन्हे दाखल झाल्याने अडचणी वाढल्या! नव्या अध्यक्षपदासाठी वाचा कुणाची नावे आघाडीवर..!
कासम गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने मेहकर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला सुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांना जिल्हाध्यक्ष बनवले तर पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते असा युक्तिवाद कासम गवळी यांचे पक्षांतर्गत विरोधक वरिष्ठांकडे करू शकतात. त्यामुळे कासम गवळी यांचे नाव या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडल्यात जमा झाल्याची चर्चा आहे. जयश्री ताई शेळके, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रामविजय बुरुंगले यांची नावे चर्चेत असली तरी या सगळ्यांनाच पुढल्या काही दिवसांत स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे.
त्यामुळे त्यांना एक व्यक्ती एक पद हे काँग्रेसचे धोरण अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे सध्यातरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निष्ठावंत ॲड विजय सावळे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. खासदार मुकुल वासनिक यांच्याशी जवळीक आणि जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क या ॲड विजय सावळे यांच्या जमेच्या बाजू आहेत.