जिजाऊ ज्ञानमंदिरने खेड्यात इंग्रजी शिक्षण रुजवले :आमदार श्वेताताई महाले यांचे प्रतिपादन! रायपूर येथील जिजाऊ इंग्लिश स्कुलचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात

 

बुलडाणा :( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.   जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूलने ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षण रुजवले, असे प्रतिपादन आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केले. 

ukyfh

तालुक्यातील पळसखेड भट (रायपूर) येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश स्कुलच्या दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे उदघाटन २५ डिसेंबर रोजी त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सातगाव भुसारीच्या सरपंच वनिताताई देशमुख, पळसखेड भटच्या सरपंच कौशल्याताई खेडेकर, पिंपळगाव सराईचे सरपंच प्रदिप गायकवाड, सिंदखेडचे सरपंच विजय चिकटे, शिरपूरचे सरपंच दिनकरराव शेळके यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

जिजाऊ ज्ञानमंदिर भविष्यातील स्पोर्ट अन नॉलेज हब - संदीपदादा शेळके

जिजाऊ ज्ञानमंदिरने नॉलेज आणि क्रीडाक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शाळेचे विद्यार्थी चीन, जपान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश व पाकिस्तान यांसारख्या देशातील खेळाडूंविरुद्ध खेळुन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकले आहेत. याचा आपणास सार्थ अभिमान आहे. २०१९ मध्ये ४२ मेडल शालेय व खुल्या स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवले. यावर्षी २७ विद्यार्थ्यी जिल्हास्तरापर्यंत तर ३७ विद्यार्थी हे विभागस्तरावर पोहोचले आहेत. भविष्यात स्पोर्ट हब म्हणून जिजाऊ ज्ञानमंदिर नावारुपाला येईल, असा विश्वास संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला.

स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ अशोक खरात म्हणाले की, इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीतुन शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. जिजाऊ ज्ञानमंदिरमध्ये उत्तम इंग्रजी शिक्षण मिळते ही अभिमानाची बाब आहे. प्रमुख अतिथी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, डॉ. गायत्री साबळे, डॉ. साधना भवटे, डॉ.  माधुरी चाटे, राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, 
आदर्श शाळा समन्वयक अमर चिखले यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.

शाळेचा बेस्ट स्टुडंट अवार्ड वेदिका पडघान हिने पटकावला. बेस्ट टिचर अवार्ड शिक्षिका रुपाली पाटोळे यांना मिळाला. दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले. संचालन योगेश खिल्लारे, किरण जाधव, ज्ञानेश्वर भुसारी आणि वैशाली भोंडे यांनी केले. आभार शैलेश कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी   परिश्रम घेतले.