बर्थडे आहे भावाचा,जल्लोष सारा कृषी विभागाचा! कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या वाढदिवसाची हौस लय मोठी; कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश! दोन - तीन गाड्या भरून माणसं घेऊन या म्हणे

 
sattar
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नेत्याचा वाढदिवस म्हटला की मोठा तामझाम..काय काय कार्यक्रम होतील, अन् कोणाचा कार्यक्रम होईल याचा काही नेम नाय. त्यातही नेता जर सत्ताधारी पक्षाचा असला की वाढदिवस नेत्याचा अन् खर्च सरकारी यंत्रणांचा अशी  अलिखित तऱ्हा असते. आता १ जानेवारी ला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा बर्थडे हाय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा जल्लोष सिल्लोड मध्ये म्हणजे त्यांच्या होम ग्राउंड वर होणार हाय. मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या जल्लोषासाठी कृषी विभागाचे कृषी सेवक, कृषी सहाय्यक यांच्यावरही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले .

सिल्लोड मध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होणार आहे. अर्थात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचा योग साधूनच उद्या,१ जानेवारीला या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला गर्दी जमविण्याची जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्याच्या अधिकाऱ्यांना तशा तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. तर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवक, कृषी सहाय्यक यांना आपापल्या कार्यक्षेत्रातून दोन - तीन गाड्या भरून माणसे सिल्लोडला नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाड्यांचे नंबर आणि चालकांची नावे सिल्लोडच्या सायबांना कळविण्यात येतील, ते गाडी भाड्याची व्यवस्था करतील असेही सांगण्यात आले आहे. आता तुम्ही सांगा वाचकहो, नेत्याच्या वाढदिवसाला, शासकीय कर्मचाऱ्यांना हे असं राबून घेणं बरोबर हाय का? बरं असो... अब्दुलभाई, आमच्याकडून हॅप्पी बर्थडे....!! तेवढं "ते" पाहून घ्या...!!