जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भात महत्वाची बातमी! भावी उमेदवारांनो २८ जुलैची तारीख तुमच्यासाठी महत्वाची, का ते वाचा..
Jul 22, 2022, 20:25 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सुप्रिम कोर्टातील सुनावणी मुळे स्थगित झालेली बुलडाणा जिल्हा परिषद व 13 पंचायत समित्यांची आरक्षण सोडत आता 28 जुलैला काढण्यात येणार आहे. या सोडतीवर 2 ऑगस्ट पर्यंत हरकती, सूचना सादर करता येणार आहे.
बुलडाणा जिल्हापरिषदेच्या 68 गटांची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर 13 पंचायत समित्यांची सोडत संबंधित तहसील कार्यालयात काढण्याचे नियोजन आहे. यावेळी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व सर्व साधारण प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. 29 ला या आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.यावर 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान हरकती सादर करता येईल.या हरकतींचा विचार करून 5 ऑगस्टला अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.