महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या यात्रेला दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद!साहेबराव सरदार म्हणाले, "त्या" नेत्यांचे डोके ठिकाणावर नाही; दत्तात्रय लहाने म्हणाले,
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करण्यात येत आहे. महाराष्ट्रभरातून या नेत्यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सन्मान यात्रा काढली आहे.
बुलडाणा तालुक्यातील सर्वच गावांत ही यात्रा जाणार आहे. आज ,१७ डिसेंबरला नांद्राकोळी, अजिसपूर, पांग्री उबरहंडे,रायपूर, पिंपळगाव सराई, भडगाव, सावळी, चांडोळ या गावांत या यात्रेने प्रवास केला. सर्वच गावांत या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. प्रत्येक गावांत गावकऱ्यांच्या वतीने यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नांद्राकोळी येथे झालेल्या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव सरदार यांनी भाजपच्या नेत्यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. महापुरुषांचा अपमान जाणीवपूर्वक करण्यात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांचे डोके ठिकाणावर नाही असेही ते म्हणाले. यात्रेचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करण्याचा ठेकाच भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. समाजासमोर असलेला महापुरुषांचा आदर्श धुळीस मिळवायचा आणि नंतर मनुस्मृती लादायची, लोकशाही घालवून हुकुमशाही लादायची हा त्यांचा डाव असल्याचे ते म्हणाले. ते महापुरुषांचा अपमान करतील आपण महापुरुषांचा सन्मान करू असेही श्री. लहाने म्हणाले.