दिशा बचतगट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद खासदार सुप्रिया सुळे यांचे गौरवोद्गार! रोजगार महामेळाव्यास सदिच्छा भेट
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी रोजगार महामेळाव्याचे आयोजन केले होते. मातोश्री मंगल कार्यालयात हा रोजगार मेळावा संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यास खा. सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, दिशा बचतगट फेडरेशनच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यात मुलाखतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्ती देण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम आहे. यापूर्वी ११ डिसेंबर २०२२ रोजी बुलडाणा येथे रोजगार मेळावा घेण्यात आला होता.
यावेळी जयश्रीताई शेळके यांनी सुप्रिया सुळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी मंत्री राजेश टोपे, आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणी मुक्ताईनगरच्या चेअरमन रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष नाझेर काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सलक्षणा सलगर, लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सीताराम चौधरी, मधुकर गव्हाड, नरेश शेळके, डी. एस. लहाने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.