पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरुद्ध हिंदू राष्ट्र सेना आक्रमक! जिल्ह्यातील हिंदु संघटना उद्या बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Sep 25, 2022, 08:17 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाई विरोधात शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काहींनी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या होत्या. आता याविरोधात हिंदुराष्ट्र सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांचा निषेध करणाऱ्यासाठी उद्या २७ सप्टेंबर ला हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख विजयराव पवार यांनी तशी माहिती दिली.
पुण्यात घडलेला प्रकार म्हणजे भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा अपमान आहे. पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांवर पोलिसांनी तिथेच गोळ्या घालायला हव्या होत्या असे विजयराव पवार म्हणाले. या जिहादी मानसिकतेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हिंदू संघटनांनी २७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.