ग्रामपंचायत निवडणुकाचे निकाल जाहीर; ७ ठिकाणी अविरोध निवड

 
jgn j
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून  बहुतेक ठिकाणी मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिल्याचे चित्र आहे. ७ ग्रामपंचायतच्या लढती अविरोध झाल्याने या लढती नाममात्र ठरल्या.

मृग नक्षत्राच्या तोंडावर होणाऱ्या ६० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्या! तब्बल ४५ ग्रामपंचायत मध्ये एकही उमेदवारी अर्जच नाही, ७ ठिकाणी अविरोध निवड झाली .यामध्ये दत्तपुर, घाटनांद्रा, केशवशिवनी, मांडवा समेट डोंगर, सावरगाव तेली, लाखनवाडा, इसारखेड येथील प्रत्येकी एका सदस्याची अविरोध निवड करण्यात आली.

आणि ...निकाल...

अंढेरा( देऊळगावराजा) मध्ये राहुल अशोक इंगळे (२२५ मते) यांनी बाजी मारली.  हरणखेड( मलकापूर)  मध्ये मीनाक्षी खाचणे ( १२५ मते) तर  मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती, बोराखेडी मध्ये भगवान भिकाजी जाधव ( ३०४मते) ,युवराज कल्याणकर( २२८ मते) यांनी बाजी मारली. या  ४  जागांसाठी  ९ उमेदवार रिंगणात उतरल्याने अत्यंत चुरशीने या निवडणुका पार पडल्या.