GOOD NEWS चिखली विधानसभा मतदारसंघातील १३ ग्रामीण व ५ इतर जिल्हा मार्गांना प्रमूख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता; आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश..!
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील प्रमुख जिल्हा दर्जोन्नत राज्यमार्ग म्हणून करण्याबाबत
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत १) धोडप पेठ एकलारा अंबाशी चंदनपुर मेरा बु. राहेरी रस्ता , २)बुलडाणा सागवन रायपुर पि. सराई भारज खापरखेडा गोपी मराडखेडा ते सावरखेडा रस्ता.३) प्रजिमा- २१ ते देवपुर दुधा माळवंडी केसापूर पांग्री शिरपूर केळवद किन्होळा धोडप राज्यमार्ग - २७४ ला जोडणारा रस्ता या तीन जिल्हा मार्गांना रस्त्यांना राज्य महामार्गांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे चिखली विधान सभा मतदार तीन प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्ग तर आता १३ ग्रामीण व ५ ईतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळाला आहे.
रस्त्यांच्या दर्जा वाढीत आ.श्वेताताईंनी घडविला इतिहास
चिखली विधान सभा मतदार संघातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. आमदार श्वेताताई महाले पाटील या आमदार झाल्यानंतर त्यांनी "रस्ते विकासाची धमनी" असल्याने रस्ते विकासाकडे विशेष लक्ष देण्याचे काम केले . यामध्ये योजना बाह्य रस्ते योजनेत समाविष्ट करणे , ग्रामीण रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग करणे, इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गांचा तर प्रमुख जिल्हा मार्गांचा राज्य महामार्गात दर्जवाढ करण्याचे नियोजन केले . तशा प्रकारचे परिपूर्ण प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आले. त्यामुळे आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत १३० किलोमिटरच्या राज्य महामार्ग तर आता ७६.४०० किलोमिटच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळाला आहे . एकाच आर्थिक वर्षात २०६.४०० किलोमीटरच्या रस्त्यांची दर्जावाढ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी रस्त्यांच्या दर्जा वाढीमध्ये इतिहास घडविला आहे.
अजूनही रस्त्यांची दर्जा वाढ होणार: आ. श्वेताताई
चिखली विधान सभा मतदार संघातील वरील दर्जावाढ झालेल्या रस्त्यांच्या व्यतिरिक्त आणि अगोदर मिळालेल्या रस्त्याच्या दर्जा वाढ व्यतिरिक्त अजूनही रस्त्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले होते. यामध्ये दोन गावांना जोडणारे रस्ते योजना बाह्य रस्ते, तसेच काही ग्रामीण आणि ईतर जिल्हा मार्गांचे प्रस्ताव सादर केलेले होते. परंतु मागील आघाडी सरकारने राजकिय आकसापोटी या प्रस्तावांना मान्यता दिली नव्हती . परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्याने विकास कामांची गती तर वाढलीच परंतू रखलेल्या कामांना सुद्धा मान्यता मिळत आहे. त्या अनुषंगाने चिखली विधान सभा मतदार संघातील राहिलेल्या रस्त्याची सुद्धा लवकरच दर्जावाढ होणार असून त्यामुळे मतदार संघातील दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त करुन या रस्त्यांच्या दर्जा वाढीस मान्यता मिळाल्याने आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.