GOOD NEWS मराठा तरुणांनो "या" संधीचे सोने करा! सरकारकडून व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी इतके लाख रुपये! योजनेची सगळी माहिती बातमीत..

 
not
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केवळ नोकरीवर अवलंबून न राहता  तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा आणि त्याकरिता तरुणांना सहजरित्या कर्ज उपलब्ध व्हावे  यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे तरुणांना १० हजार रुपयांपासून तर १ लाख रुपयापर्यंतचे  बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना या योजनेचा मोठा फायदा मिळू शकतो.
  

सरकारच्या या योजनेमुळे मराठा तरुणांचे व्यवसायिक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
आधी १० हजार नंतर...!

दरम्यान या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आधी १० हजार रुपये कर्ज देण्यात येईल. कर्जासाठी दिलेल्या रकमेचा उपयोग तरुणाने कसा केला हे तपासून त्याला पुढच्या टप्प्यात ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्या जाईल. ५० हजार रुपयांचा योग्य विनियोग करून नियमित परतफेड केल्यास तरुणाला आणखी १ लाख रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

अशी करा सोपी परतफेड..

तरुणाला जेव्हा १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्या जाईल तेव्हा या कर्जाची परतफेड प्रतिदिन १० रुपये याप्रमाणे करावी लागेल. ५० हजार रुपये कर्जाची परतफेड परतफेड प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे करता येईल तर १ लाख रुपये कर्जाची परतफेड १०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे करता येणार आहे.  विशेष म्हणजे १८ ते ६० या वयोगटातील होतकरूंना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे..!

 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी  कर्जदाराचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन हा अर्ज करता येतो.