GOOD NEWS! विदर्भात बुलडाण्याचा डंका; आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांची विदर्भ को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन च्या अध्यक्षपदी एकमताने निवड! सलग दुसऱ्यांदा सांभाळणार अध्यक्षपदाची जबाबदारी
Nov 25, 2022, 16:45 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची आज,२५ नोव्हेंबरला दि विदर्भ मार्केटिंग को - ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा ते फेडरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असून त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा राहणार आहे.
सहकार क्षेत्रात अति महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दि विदर्भ मार्केटिंग को - ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड नागपूरच्या २१ संचालकांची निवडणूक याआधी पार पडली होती. त्यातील १७ संचालक अविरोध तर ४ संचालकांसाठी मतदान पार पडले होते. संचालकांच्या निवडणुकीत सुद्धा आ.डॉ.शिंगणे अविरोध निवडून आले होते. दरम्यान आज,२५ नोव्हेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.