भावी सदस्यांनो$$ ही बातमी तुमच्यासाठी! जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात महत्वाची बातमी..!
राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ओबीसी वगळून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण महिलांच्या आरक्षण साठी ही सोडत काढण्यात येणार आहे. जीपच्या ६८ जागांची सोडत जिल्हाधिकारी स्तरावर तर पंचायत समित्यांची तहसीलदार स्तरावर काढण्यात येईल. अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या चा उतरता क्रम आणि ९ मे २०२२ रोजीच्या आदेशातील चक्राणू क्रम( रोटेशन) लक्षात घेऊन ही लॉटरी निघणार आहे. आता श्रद्धाळूसाठी अशुभ असलेल्या १३ तारखेला निघणाऱ्या या लॉटरी मध्ये कुणाला लॉटरी लागते, ती कुणाला शुभ अन अशुभ ठरते, महिलामुळे किती बाप्यांची संधी हुकते हे १३ तारखेला ला स्पष्ट होणार आहे.
१५ पासून हरकती
दरम्यान प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यावर त्यावर १५ ते २१ जुलै दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती घेता येणार आहे. त्यावरील अभिप्राय सह कलेक्टर आपला अहवाल २५ जुलैला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. २९ ला आयोग मान्यता देणार आहे.