माजी मंत्री डॉ.शिंगणे ११ जिल्ह्यातील प्रश्नांवर बरसले!बुलडाण्यातील ओल्या दुष्काळावर लक्षवेधी

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भाच्या विकासासाठी राज्य सरकार पॅकेज जाहीर करते. या पॅकेजनुसार किती खर्च झाला याचा आढावाही घेतला जात नाही. विदर्भातील ११ जिल्ह्यांचा विचार करण्यात यावा व अतिवृष्टीतील मदतीसह बुलडाणा जिल्ह्यात ३६ लाख हेक्टर वरील पिके पाण्यात गेल्याने,ओला दुष्काळ जाहीर करावा, या अपेक्षांसह माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर बरसले.

विदर्भाच्या विकासासाठी राज्य सरकार पॅकेज जाहीर करते. या पॅकेजनुसार किती खर्च झाला याचा आढावाही घेतला पाहिजे. विदर्भाचा विकास असा उल्लेख करताना विदर्भातील ११ जिल्ह्यांचा विचार करण्यात यावा, बुलडाणा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच कृषी महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणीही डॉ.शिंगणे यांनी यावेळी केली.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मरण झाले आहे.

३६ लाख हेक्टरवरील पिके बुडाली. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. तसेच या पैशाला राष्ट्रीयकृत बँकांनी होल्ड लावला तो हटवण्यात यावा. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्या शिंगणे यांनी केल्या. कासूप, उत्पादक, सोयाबीनला हमीभाव, संत्र्यांवर पडलेला रोग, राजामाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजाचा विकास आराखडा आदी विविध मुद्द्यांवर शिंगणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.