माजी आमदार सानंदा म्हणाले;ज्ञानेश्वर पाटलांना हे शोभल नाही; ते आमचे घरघुती भांडण, पण वरिष्ठांकडे तक्रार करणार!
११ एप्रिल रोजी खामगाव शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले काँग्रेसनेते ज्ञानेश्वर पाटील यांनी आमदार आकाश फुंडकर यांना दुचाकीवर बसवले व सेल्फी काढला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील हे आकाश फुंडकर यांच्या दुचाकीवर बसले होते.त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई खासने यांनी ज्ञानेश्वर पाटलांवर गंभीर आरोप केले होते.
ज्ञानेश्वर पाटलांची ही कृती काँगेस कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना देणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. शिवाय आपला बायोडिझेलचा व्यवसाय सुरळीत चालावा, कुणी तक्रार करू नये यासाठी तर ज्ञानेश्र्वरदादांनी आकाश फुंडकरांना गाडीवर मिरवले नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान आपण सरस्वतीताई खासने यांनी केलेल्या आरोपांशी पूर्णपणे सहमत असल्याचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना म्हणाले. त्यांचा काँगेस पक्षाचा प्रवास अडीच वर्षांचा आहे. आम्ही तीस वर्षांपासून मतदारसंघात काँगेसची बांधणी केली आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यांच्या या कृतीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे असे श्री सानंदा म्हणाले. पराभूत झाल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील गेल्या अडीच वर्षांत कुठे होते? कोरोनाकाळात कुठे होते असा सवालही सानंदा यांनी केला. आम्ही १५ दिवसांत प्रामाणिकपणे मेहनत करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ७३ हजार मते मिळवून दिली. मात्र याची जाण त्यांना नाही. आगामी निवडणुकीत पक्ष कोणाला तिकीट द्यायचे ते ठरवेल मात्र ज्ञानेश्वर पाटील यांची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे ते म्हणाले .