मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजसिंह शेगावात! सभास्थळाची पाहणी केली अन् श्रींचे दर्शन घेतले! १८ नोव्हेंबरला खा. राहुल गांधींची सभा..

 
yjht
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १८ नोव्हेंबरला खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शेगावात येणार आहे. शेगाव येथे होणाऱ्या भव्य जाहीर सभेला खा. राहुल गांधी संबोधित करणार आहेत. दरम्यान या सभेची जोरदार तयारी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. आज, १६ नोव्हेंबरला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजसिंह यांनी शेगावात भेट देऊन सभास्थळाची पाहणी केली.

 बाळापूर रोडवरील १९ एकर   जमिनीवर या सभेची जय्यत सुरू आहेत. तब्बल ५ लाखांवर नागरिक या सभेला गर्दी करणार असल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. देश , प्रदेश पातळीवरील अनेक नेते या सभेच्या पुर्वतयारीसाठी शेगावात येऊन गेले. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे २० दिवसांपासून शेगावात तळ ठोकून आहेत. दरम्यान आज, दिग्विजयसिंह यांनी सभास्थळाची पाहणी करून तयारीबद्दल समाधान  व्यक्त केले.

यावेळी जिल्ह्याच्या संपर्क मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार राजेश एकडे, आमदार बळवंत वानखेडे, डॉ.जयश्रीताई थोरात, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रामविजय बुरुंगले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण आदींनी दिग्विजयसिंह यांचे स्वागत केले. यावेळी सभेच्या नियोजनासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिग्विजयसिंह यांनी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.