'हर घर तिरंगा' अंतर्गत शहरात ध्वज विक्री केंद्र ; 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार उपक्रम

 
jyyu
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भारताला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षे पूर्ण होत असून या  पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती कायम  रहाव्या व या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने "आजादी का अमृत महोत्सव " हा उपक्रम अंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये  हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

या उपक्रमांच्या अनुषगाने बुलडाणा नगर परिषदेच्या वतीने  शहरातील एडेड हायस्कूल समोरील हुतात्मा स्मारकाच्या  आवारात ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले. केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते  श्री पठाण  यांना ध्वज विक्री करुन करण्यात आले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते,  अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे,  बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे उपस्थित होते.

उपक्रमा विषयी मुख्याधिकारी पांडे यांनी  सविस्तर मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन, प्रास्ताविक महेंद्र सौभागे यांनी केले. राष्ट्रध्वज हाताळताना घेण्यात येत असलेली दक्षतेबद्धल मार्गदर्शन करत  उपक्रमा मध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले .