स्कायमेट' चा अंदाज शेतकऱ्यांना मिळणार नाही! विमा कंपन्यांचे भले करण्यासाठीच शासनाचा निर्णय ; रविकांत तुपकरांचा आरोप

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे ' स्कायमेट' या हवामानविषयक संस्थेचे अंदाज शेतकऱ्यांना मिळणे बंद होणार असून केवळ शासनालाच ही माहिती मिळणार असल्याची माहिती 'स्वाभिमानी' चे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे .

हा निर्णय शेतकरी विरोधी असून  केवळ विमा कंपन्यांचे चांगभले करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असा आरोप तुपकरांनी  केला आहे. ही कंपनी व राज्य सरकार मध्ये करार झाला होता.त्यामुळे २०१८ ते आतापर्यंत शेतकऱ्यांना ही माहिती मिळत होती. त्यामुळे त्यांना पीक विमा कंपन्याकडे तक्रार करणे शक्य व्हायचे. मात्र आता पर्जन्यमानाचे अंदाज मिळणे बंद झाल्याने  आता ते तक्रार करणार तरी कशी? असा सवाल  तुपकर यांनी उपस्थित केला आहे. 

  कंपन्यांधी साटेलोटे करीत खिसे भरण्याची ही नवी योजना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध असून  सरकारने हा मनमानी निर्णय तात्काळ रद्द करावा अशी तुपकरांची मागणी आहे.