मेहकरात खा. जाधवांचे वर्चस्व कायम? मेहकर तालुक्यातील ४९ पैकी ४० ग्रामपंचायती जिंकल्याचा केला दावा..!! वाचा कोणत्या गावाचे कोण कारभारी..!

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात किमान २०० सरपंच हे बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युतीचे निवडूण येतील असा दावा खा. प्रतापराव जाधवांनी निवडणुकीपूर्वीच केला होता. दरम्यान आज ,२० डिसेंबरला हाती आलेल्या निवडणुकीनंतर प्रत्येक राजकीय पक्ष विजयी उमेदवार आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा करीत आहेत. खा. जाधव सध्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत असल्याने दिल्लीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नसली तरी मेहकर तालुका बाळासाहेबांच्या शिवसेना वतीने मेहकर तालुक्यातील ४९ पैकी ४० जागा जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.

 मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून खा.प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर  यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मेहकर तालुका बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विजयी सरपंचाचा व ग्रामपंचायत सदस्यांचा युवासेना कार्यकारी सदस्य ऋषी जाधव, नीरज रायमुलकर, योगेश जाधव , भूषण घोडे यांनी सत्कार केला.  हा विजय केलेल्या विकासकांमांचा आहे अशी प्रतिक्रिया ऋषी जाधव यांनी दिली आहे.
    
मेहकर तालुक्यात कुठे कोण झाले विजयी..वाचा यादी...!

१) सारगंपुर -- शेळके गजानन मधुकर
२) बरटाळा -- सावंत कुंता गणेश
३) चिंचोली बोरे -- राजुगुरु संतोष रामेश्वर
४) वर्दडी वैराळ -- पल्लवी कडुबा वैराळ
५) वडगांव माळी -- दत्ता तुळशिराम गवई
,६) बाभुळखेड -- गायकवाड शिवशंकर भागवत
७) उसरण -- निर्मला दिलीप गवई
८) दुधा -- पाखरे संगीता भानुदास
९) कल्याणा --- सोनुने निकीता संजय
१०) परतापुर -- राजेंद्र बाबुसिंग पवार
११) अंत्री देशमुख -- देशमुख ज्ञानेश्वर अशोकराव
१२) आंध्रुड -- देशमुख बालासाहेब भिमराव 
१३) हिवरा साबळे -- गया अरुण पोपळघट
१४) अकोला ठाकरे -- ठाकरे अर्चना परशुराम
१५) पारखेड -- दिव्या भिमराव अवसरमोल
१६) मांडवा फाॅरेस्ट -- शिंदे सिदाशिव समाधान 
१७) वडाळी -- शिंदे दुर्गा अभय
१८) उकळी -- जेठे जनाबाई विठ्ठल
१९) सुकळी -- पवार राजेश सुरेश
२०) सोनाटी -- बदर बाळाबाई रविंद्र
२१) घुटी -- चव्हाण कैलास देविदास
२२) लोणीकाळे -- जवंजाळ विशाल नारायण
२३) पारडा -- बच्छीरे रुख्मिणी झनकलाल
२४) बदनापूर -- कावेरी वामन आसोले
२५) कळपविहिर -- तांगडे प्रमोद विठोबा
२६) प्रिंपीमाळी -- इंगळे निता शाम
२७) साब्रा -- ठोकरे सुभाष एकनाथ
२८) मोळी -- नागरिक कविता विवेक
२९) जनुना -- अर्चना विशाल तिवाले
३०) विठ्ठलवाडी -- राठोड धनराज मानसिंग
३१) कंबरखेड -- धोंडगे अर्चना ब्रम्हचारी
३२) भालेगाव -- निकम प्रविण अलका 
३३) मिस्कीनवाडी -- वाघ अनिता ज्ञानेश्वर
३४) भोसा -- चव्हाण चित्रलेखा दिनकर
३५) दुर्गबोरी -- कांबळे वच्छलाबाई कुंडलीक
३६) उटी -- काठोळे वैशाली सुरेश
३७) वरवंड -- दवंगे नागेश रामदास
३८) नायगांव देशमुख -- बोराडे ज्योती सुभाष
३९) लोणी -- उज्ज्वला महेंद्र जाधव
४०) लव्हाळा -- लहाने मिना गणेश
४१) हिवरखेड -- मोरे वंदना गौतम
४२) वर्दडा -- शिनगारे बद्रीश्वर बबन
४३) पेनटाकळी -- परमेश्वर शिवाजी वानखेडे
४४) सोनारगव्हाण -- शेख परविनबी आरीफ 
४५) थारबर्दापुर -- वानखेडे सिध्दार्थ भिमराव
४६) मुंदेफळ -- चांदणे स्वाती आनंद
४७) खंडाळा -- मानघाले रेणुका रतन
४८) माळेगांव -- अंभोरे प्रकाश सुखदेव
४९) पिंपळगाव उंडा -- जाधव सिमा रामकिसन

( महत्वाचे: ही विजयी झालेल्या सरपंचांची यादी आहे, हे सरपंच कोणत्या पक्षाचे याचा दावा बुलडाणा लाइव्ह करीत नाही..)