खा. मुकुल वासनिकांचे 'ऑपरेशन गोवा' यशस्वी! गोव्यातील बंडोबा झाले थंडोबा!! बुलडाण्यात जल्लोष

 
gjghjy
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :
महाराष्ट्रातील आघाडी सरकार पायउतार झाल्यावर गोवा काँग्रेसमध्ये देखील  बंड उफाळून आले! या आव्हानाचा सामना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले खा. मुकुल वासनिक यांनी गोव्यात दाखल होताच  तातडीने राजकीय व्युव्हरचना करून बंडोबाना  थंडोबा करीत ऑपरेशन गोवा यशस्वी करून दाखविले. यामुळे वासनिकांची तीनेक दशके कर्मभूमी राहिलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

गोव्यातील 11 पैकी  5 ते 6 आमदारांनी बंड करून भाजपमध्ये जाण्याचे मनसुबे रचले होते. याची कुणकुण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लागताच काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी  खा. मुकुल वासनिक यांना  डॅमेज कंट्रोलसाठी गोव्याला पाठविले. दरम्यान सोमवारी दिवसभर खा. मुकुल वासिनक यांनी पणजी येथे काँग्रेस  बैठक घेवून आमदारांचे म्हणणे ऐकूण घेतले. विशेष म्हणजे या बैठकीला काही नॉटरिचेबल असलेले आमदार सुध्दा उपस्थित झाले .

 खा. वासनिक म्हणाले की, काही विरोधी पार्टीचे लोक विशेषतः काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. गोव्यामध्ये हाच प्रयोग  करण्याचा प्रयत्न झाला. मात्र काँग्रेसच्या आमदारांनी दाखवून दिले की, गोव्यामध्ये आम्ही असा प्रकार खपवून घेणार नाही. दरम्यान  काँग्रेस पार्टी गोव्यामध्ये कशी मजबुत व एक संघ राहील यावरही त्यांनी  बैठकीत चर्चा केली. खा. वासनिकांची संकट मोचक म्हणून  नियुक्ती, त्यांचे तात्काळ गोव्यात आगमन,  भाजपचे  छुपे कडवे आव्हान, वासनिक या राजकीय कारस्थानावर कशी  मात करतात याबद्धल जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.