खा. मुकुल वासनिक गोव्यात दाखल! काँग्रेसच्या बंडाचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न; संकटमोचक ची भूमिका पार पाडण्यात यशस्वी होणार का?

 
kc
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गोव्यातील काँग्रेस आमदारांचे बंड मोडून काढण्यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेते खा. मुकुल वासनिक यांना तातडीने गोव्यात पाठविले. संकटमोचक ची जवाबदारी पेलून वासनिक बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होतात काय याकडे दिल्ली सह दूरवरच्या बुलडाणा  जिल्ह्यातील काँग्रेस जणांचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्र राज्यातील महाआघाडी सरकार कोसळल्याने धक्का बसलेल्या काँग्रेसला गोव्यात अचानक उद्भभवलेल्या बंडखोरीच्या संकटाचा सामना करण्याची पाळी आली आहे. गोवा विधानसभेतील ११ पैकी ८ काँग्रेस आमदारांनी बंड पुकारत वेगळा गट स्थापन करून पक्षाला आव्हान दिले. या गटाने १० तारखेला बैठक घेऊन पुढील रणनीती वर चर्चा केली. याची कुणकुण लागल्यावर काँग्रेसने अगोदर राज्याचे प्रभारी गुंडूराव गोव्यात दाखल झाले.

त्यानंतर पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खा. वासनिक यांनी राजकीय नुकसान टाळण्यासाठी खा. वासनिक यांना याकामी नियुक्त केले. १० जुलैच्या रात्री सव्वा अकरा वाजता महासचिव के.सी. वेणूगोपाल यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली. यामुळे खा. वासनिक आज गोव्यात दाखल झाले असून त्यांनी डॅमेज कन्ट्रोल साठी प्रयत्न सुरु केले आहे.