डॉ. रणजित पाटलांना आधीपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करणार! खा. प्रतापराव जाधवांचा संकल्प! मेहकरात पार पडला पदवीधरांचा मेळावा; रणजित पाटलांना विजयाचा विश्वास
Jan 27, 2023, 08:52 IST
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): याआधी झालेल्या दोन्ही निवडणुकीत लोणार आणि मेहकर तालुक्यात रणजित पाटलांना एकतर्फी मतदान झाले. आताच्या निवडणुकीत रणजित पाटलांना बुलडाणा जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळणार आहे. पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने रणजित पाटलांना विजयी करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. असे प्रतिपादन खा. प्रतापराव जाधव यांनी केले. रणजित पाटलांच्या प्रचारार्थ मेहकर येथे झालेल्या पदवीधरांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आ. रणजित पाटील, आ. संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवासेनेचे सचिव ऋषी जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळुकार, भूषण घोडे, माधवराव जाधव आदींची उपस्थिती होती.
बाळासाहेबांच्या शिवसेनेने ही विधानपरिषद निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत बाळासाहेबांच्या शिवसेनेने व भाजपने राज्यात व विशेषतः बुलडाणा जिल्ह्यात मोठे यश प्राप्त केल्याचेही खा.जाधव म्हणाले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक रणजित पाटलांना विजयी करण्यासाठी कामाला लागले आहेत . रणजित पाटलांसारख्या अनुभवी व उच्चशिक्षित सदस्याची विधीमंडळला गरज असल्याने रणजित पाटलांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन खा.जाधव यांनी यावेळी केले.
१२ वर्षांच्या कामाचे फळ मिळेल, रणजित पाटलांना विजयाचा विश्वास
१२ वर्षे आमदार व ५ वर्षे मंत्रिपद असताना मिळालेल्या ११ खात्यांचा उपयोग पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. शिक्षकांच्या अनुदानाचा विषयही आपण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. २०१६ ला २० टक्के, २०१९ ला ४० टक्के तर आता ६० टक्के अनुदान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यासाठी ११०० कोटी रूपयांचा निधी दिल्याचे रणजित पाटील म्हणाले. १२ वर्षे पदवीधरांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कामाचे फळ आपल्याला या निवडणुकीत मिळणार असल्याने विजयाचा विश्वास असल्याचे रणजित पाटील म्हणाले.