कार्यकर्त्यांना पागल ठेवू नका! सैलानी बाबाला नेऊन उपचार करा; चांगल्या मेंटल हॉस्पिटलला न्या; नरेंद्र खेडेकरांचा आ. गायकवाडांना टोला! म्हणाले, हिंदी येत नाही बुलडाण्याची इज्जत घातली! पहा व्हिडिओ

 
hgh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज बुलडाणा येथील गर्दे सभागृहात शिवसेनेचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. त्याआधी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी शिंदेगटात गेलेल्या आमदार खासदारांवर विशेषतः आ. संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी आ. गायकवाड यांनी हिंदीतून केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला.
त्यांना हिंदी येत नाही. आग्यामोहळ, भानगड अशी हिंदी बोलून त्यांनी बुलडाण्याची इज्जत घालवली असा हल्लाबोल नरेंद्र खेडेकरांनी केला.

कार्यकर्त्यांना पागल ठेवू नका. त्यांच्यावर उपचार करा. सैलानीबाबाला घेऊन जा, निंबू आणि दोराच लागते असेही खेडेकर म्हणाले. आग्र्याला, नागपूर ला चांगला मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांचा उपचार करा असा टोला खेडेकरांनी लगावला. जून महिना शिवसैनिकांसाठी वाईट ठरला. जुलै महिना १२ खासदारांच्या गद्दारीमुळे क्लेशदायक ठरला.मात्र २०२४ च्या निवडणुकीत मातोश्री वरून उद्धव ठाकरेंना पुन्हा वर्षा बंगल्यावर नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे खेडेकर म्हणाले.जे आमदार शिंदेसेनेत गेले ते आम्हाला गद्दार म्हणू नका, भडवा म्हणू नका असे म्हणतात. मग तुम्हाला पर्यायी काय म्हणायचे असे आम्ही त्यांना विचारले, मात्र त्यांचा अजून फोन आला नाही असे खेडेकर म्हणाले.
 
 तुम्ही येणार ते कळले अन् आमदारांची भाषा बदलली!

त्यादिवशीच्या कार्यक्रमात त्यांनी गोंधळ घातला पण आज का कुणाची हिम्मत झाली नाही कारण महाराष्ट्राचे शेर आले आहेत. तुम्ही येणार हे कळले अन आमचे आमदार एकदम शांत झाले, त्यांची भाषा बदलली. तुमचा पायगुण चांगला असे खेडेकर अंबादास दानवे यांना उद्देशून म्हणाले.