भाजपच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नका; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी धिरज लिंगाडेंना पहिल्या पसंतीचे मत द्या; पुसदचे आमदार इंद्रनील जाधव यांचे आवाहन;

पुसद येथे धिरज लिंगाडेंच्या प्रचारार्थ पदवीधरांचा मेळावा

 
पुसद( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केंद्रातले आणि राज्यातले भाजपा सरकार फसवेगिरी करण्यात माहीर आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते काय करतील याचा नेम नाही. केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या पापाचे घडे  आता भरत आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकून येणार आहेत असा आशावाद व्यक्त करीत पुसदचे आमदार इंद्रनील जाधव यांनी अमरावती विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीत धिरज लिंगाडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पदवीधरांना केले. आज, पुसद येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते.

 पुढे बोलतांना आमदार इंद्रनील जाधव म्हणाले की, पदवीधरांच्या अनेक समस्या आहेत. तब्बल ३० वर्षे आमदार बी. टी. देशमुख यांच्यासारख्या तपस्वी आमदारांनी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत पदवीधरांचा आमदार काय असतो हे दाखवून दिले. मात्र त्यानंतर भाजपने ही निवडणूक राजकीय करण्याचे पाप केले. विद्यमान आमदारांना तर पदवीधरांच्या प्रश्नांचे काही देणे घेणे नाही, मंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी आमदारकी मिळवण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र आता त्यांचे काही खरे नाही. धिरज लिंगाडे यांनाच विधिमंडळाच्या सभागृहात पाठविण्याचा निर्धार अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील पदवीधरांनी केला असल्याचेही आमदार इंद्रनील जाधव म्हणाले. 
  
  विश्वासाला तडा जाणार नाही: धिरज लिंगाडे

  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाचही जिल्ह्यातील पदवीधरांचा मोठा पाठिंबा मिळत आहेत. १२ वर्षे मत वाया गेल्याची भावना पदवीधरांची आहे. विद्यमान आमदारांना फक्त निवडणुका आली तेव्हाच जाग येते. मंत्रीपद मिळवूनही ज्या पदवीधरांनी त्यांना आमदार केले त्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही.त्यामुळे आता आपले मत वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. जुनी पेन्शन, बेरोजगारी, शिक्षकांचे प्रश्न, अनुदानाचा प्रश्न आदी मुद्द्यांवर ही निवडणूक लढत असल्याचे धिरज लिंगाडे म्हणाले. आपण मला पाठींबा देत असल्याबद्दल आभार, आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असे यावेळी धिरज लिंगाडे म्हणाले. डॉ.नदीम, विकास जामकर, बाळाभाऊ कामारकर, बी.जी.राठोड,  श्री.धनवे, वीरेंद्र राजे, भगवान आसोले, जीआउद्दीन फारुकी यांच्यासह मोठ्या संख्येने पदवीधर मतदार यावेळी उपस्थित होते.