सत्तेचा माज दाखवू नका,तुम्ही आम्ही एकाच भट्टीतून तयार झालोय हे विसरू नका! चिखलीच्या मेळाव्यात नरेंद्र खेडेकरांचा हल्लाबोल! म्हणाले, कार्यक्रमात धुडघुस घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल

 
gyugu
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सत्तेचा माज दाखवू नका, तुम्ही आम्ही एकाच भट्टीतून तयार झालोय हे लक्षात ठेवा.  जाहीर कार्यक्रमात धुडगूस घालणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी सत्तेच्या दबावापोटी गुन्हे दाखल केले नसले तरी जनता मात्र तुम्हाला त्या गुन्ह्यांची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी चिखली येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील खासदार, आमदारांचा त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिल्ह्यात नुकत्याच नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व मेळावा चिखलीत पार पडला. या मेळाव्याला नरेंद्र खेडेकरांनी संबोधित केले. ज्या लोकांसाठी आम्ही मते मागितली, वर्गणी गोळा केली ते लोक विश्वासघात करून आमच्यातून निघून गेले. त्यांना गद्दार म्हणायचे नाही तर आणखी काय म्हणायचे असा सवाल खेडेकरांनी केला.

शिंदेगटात गेलेल्या खासदारांना आणि आमदारांना मंत्री केलं नाही मग तुम्ही कशासाठी उद्धव ठाकरेंना सोडून गेले? मग पन्नास खोके एकदम ओके हे म्हणणे बरोबर आहे की असा टोलाही खेडेकर यांनी लगावला. येत्या निवडकीत ४० गद्दार आमदार आणि १२ गद्दार खासदारांना कोणतीच लाट वाचवू शकणार नाही असेही खेडेकर म्हणाले.