वीज भारनियमनाविरोधात आज सायंकाळी जिल्हाभर कंदील आंदोलन

 
bjp
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यासह राज्यभरात महावितरणच्या वतीने सुरू केलेल्या लोडशेडींग विरोधात जिल्हा भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज, २४  एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाभर कंदील आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले.
वीज वितरणाची आणि निर्मितीची राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. विजेचे दर वाढत आहेत, त्यातही जबरदस्ती वसुलीचे धोरण राज्याचे आहे. मात्र असे असताना भर उन्हाळ्यात नागरिकांना साधी वीज सुद्धा सरकारला देत नाही.  त्यामुळे राज्य सरकारच्या नियोजनशू्य कारभाराचा निषेध म्हणून उद्या संध्याकाळी ज्या ज्या गावात, शहरात, वस्तीत  अंधार तिथे तिथे भाजपचे कार्यकर्ते कंदील लावणार आहेत असे आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.