देऊळगाव घुबे येथे उद्या शेतकरी संघटनेचा जिल्हा मेळावा! हवामान अभ्यासक पंजाबराव डख करणार मार्गदर्शन

 
gfhft
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या ८८ व्या जयंती निमित्त चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे उद्या ३ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

देऊळगाव घुबे हा शेतकरी संघटनेचा ग्रामीण भागातील गड मानल्या जातो. स्व. शरद जोशींच्या विचारांचे कार्यकर्ते परिसरातील घराघरात आहेत. उद्या होणाऱ्या या मेळाव्याला मुळे आण्णा सोशल फाउंडेशन चे रमेश आण्णा मुळे,  हवामान अभ्यासक पंजाबराव डख, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष  लक्ष्मणराव डवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, विठ्ठलराव घाडगे, देविदास कणखर, समाधान कणखर, रमेशसिंग चव्हाण, एकनाथराव थुट्टे, नामदेवराव जाधव, दामोदर शर्मा, रेखाताई खांडेभऱ्हाड, बाबुराव नरोटे, उषाताई थुट्टे, दिगंबर चिंचोले, शिवप्रसाद सारडा, तेजराव मुंडे उपस्थित राहणार आहेत.