जळगाव जामोद , संग्रामपूरात धिरज लिंगाडेंच्या प्रचाराचा झंझावात! लिंगाडेंच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजूट!
जळगाव जामोद येथील बैठक सातपुडा एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पार पडली तर संग्रामपूर तालुक्याच्या बैठकीचे आयोजन संग्रामपूरातील हॉटेल साई सभागृह येथे करण्यात आले होते. माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, डॉ.स्वाती वाकेकर, लक्ष्मणराव घुमरे, प्रकाश पाटील अवचार, राजू पाटील भोंगळ, ॲड. ज्योतीताई ढोकणे, प्रा. संतोष आंबेकर, रंगराव देशमुख,ॲड अमर पाचपोर, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडेकर, शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ, काँग्रेसचे जळगाव जामोद शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, वर्षाताई वाघ, डॉ.प्रशांत राजपूत, पराग अवचार, प्रवीण भोपळे, हरिभाऊ राजनकर, राजेश्वर देशमुख, सचिन पालकर, मनोहर बोराखडे, प्रकाश देशमुख, रवी पाटील, संजय ढगे, अमोल घोडेस्वार, अभयसिंह मारोडे यांच्यासह विविध पदवीधर संघटना, शिक्षक संघटना तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर मतदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदवीधरांच्या प्रश्नांवर गेल्या १२ वर्षात सभागृहात आवाज उठवला गेलाच नाही, पदवीधरांच्या प्रश्नावर धिरज लिंगाडे हेच एकमेव उत्तर असल्याचा सुर दोन्ही बैठकीत उमटला. त्यामुळे धिरज लिंगाडे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.