अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी धिरज लिंगाडे यांचा जाहीरनामा प्रकाशित! जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर व पदभरतीच्या मुद्द्यावर देणार भर; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो

पदवीधर विद्यार्थीही लिंगाडे यांच्या पाठीशी; एमपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला "हा" शब्द...!

 
dhiraj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाची  निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होऊ घातली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महा विकासआघाडीकडून जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जुन्या पेन्शन योजनेसह शासन पदभरती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था अमरावती विभागात आणणे तथा तरुणांच्या हाताला काम देणे.. अशा विविध मुद्द्यांचा समावेश यात असून पदवीधरांच्या प्रश्नांना घेऊन ही
निवडणूक असल्याने त्यांना प्राधान्य दिल्या जात असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे म्हणाले.

विकास आघाडीकडून या निवडणूकीत धिरज लिंगाडे हे उमेदवार असून त्यांना जुनी पेन्शन योजना संघटना, भाकप, संभाजी ब्रिगेड, विदर्भ माध्यमिक संघ, शेकाप  व विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात नमूद केले आहे की, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी  युध्य पातळीवर राज्यशासनाकडे पाठपुरावा करणे. शासन पदभरती व परीक्षांमध्ये होणारे घोटाळे दुर करणे. घोटाळे करणाऱ्यांवरती कडक कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाकडे 

पाठपुरावा करणे. मोठ्या संख्येने पुणे- मुंबईकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून पदवीधरांना इथेच मोठे प्रकल्प उभारुन नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणे. शिक्षण विभागातील रखडलेली नोकर भरती निकाली काढणे. नामांकित शैक्षणिक संस्था आपल्या विभागात निर्माण करण्यास प्राधान्य देणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था अमरावती विभागात आणणे. स्पर्धा परीक्षेसह अनुदान आयोगाकडून शैक्षणिक संस्था, इन्स्टिट्यूट व स्पर्धा परीक्षा विकासाकरीता अनुदान उपलब्ध करुन देणे. पदवीधर, बेरोजगार, चिंताग्रस्त तरुणाईचे समुपदेशन करून त्यांच्या हाताला काम देणे. उच्च शिक्षणघेणाऱ्या तरुणाईला शिक्षणासाठी सर्वकष मदत करणे. उद्योगोन्मुख तरुणाईला उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे. प्राध्यापक वर्ग, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर विशेष भर, शिक्षण विभागाच्या पद भरतीसाठी प्रयत्न, पदवीधर मंत्रालय निर्माणासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे. विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये पदवीधर वसतीगृहांची उभारणी करुन त्यांच्या निवासाची सोय करणे. शिक्षण विभागाकडून होणाऱ्या पदभरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणून गुणवत्तावान विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे. काळाची पावलं ओळखून व्यवसायिक अभ्यासक्रमाचा शालेय व महाविद्यालयीन पाठ्य-पुस्तकांमध्ये समावेश करणे. शासकीय तथा निमशासकीय संस्थांमध्ये रिक्त असलेल्या जागा, पदभरती करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे या बाबींचा समावेश लिंगाडे यांच्या जाहीरनाम्यात केला आहे.

  राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य क्रिडा विभाग व केंद्रीय क्रिडा विभाग स्तरावर सतत पाठपुरावा करणार असल्याचे शब्दही लिंगाडे यांनी जाहीरनाम्यात दिला आहे. एमपीएससीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे, याचा जाहिरनाम्यात समावेश असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो पदवीधर विद्यार्थ्यांचा लिंगाडे यांना पाठिंबा मिळत आहे.