धिरज लिंगाडे यांना शैक्षणिक व्यवस्थापनाचा प्रदिर्घ अनुभव! स्व.रामभाऊ लिंगाडे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याकडे!
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धिरज लिंगाडे यांना बालपणापासूनच समाजकारण व राजकारणाचे कडू हे त्यांच्या वडिलांपासून मिळाले होते. स्व.रामभाऊ लिंगाडे हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. शरदचंद्र पवार यांच्या वैचारिक समाजकारण व राजकारणाशी त्यांची नाळ जुळलेली होती. तर इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या राष्ट्रीय नितीचा त्यांना गर्व व अभ्यास होता. त्यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर राजकीय जागर केला होता.
बुलढाणा शहरात त्या काळात डि.एड कॉलेज आणून त्यामाध्यमातून हजारो शिक्षक रामभाऊंनी घडविले. त्यांचा हा शैक्षणिक वारसा पुढे धिरज लिंगाडे यांनी चालविला. धिरज यांनी केवळ आयत्या पिठावर रेघोट्या न ओढता वडिलांनी काढलेल्या पतसंस्थेचे नाव स्व.रामभाऊ लिंगाडे पतसंस्था असे ठेऊन विविध शाखा त्यांनी काढल्या. त्यामाध्यमातून कर्जवाटप करुन हजारो तरुणांना त्यांनी काम दिले. बुलडाणा जिल्ह्यातील पहिली सीबीएसई.पॅटर्नची शाळा ‘बुलडाणा वेंâब्रीज स्कुल’ त्यांनी आणली. पॉलिटेव्निâक कॉलेज व बी.एड कॉलेज त्यांनी सुरु करुन बुलडाण्याच्या शैक्षणिक परंपरेत भर घातली. त्यामुळे एक वेगळी शैक्षणिक वाटचाल जिल्ह्यात सुरु झाली.
धिरज लिंगाडे यांना शैक्षणिक व्यवस्थापनाचा असणारा हा अनुभव, त्यांच्यासाठी अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघात ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ निर्माण करणारा ठरत असल्याचे, त्यांच्या जनसंपर्वâ कार्यालयातील देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीची महाशक्ती..
शिंदे गट व भाजपा यांचे सरकार बनल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे, त्यात महाविकास आघाडीची महाशक्तीच एकप्रकारे दिसत आहे. धिरज लिंगाडे यांच्यासाठी अमरावती विभागातील तिन्ही पक्षाचे नेते जोमाने भिडले आहेत. यासह विविध संघटना व लिंगाडे यांनी जुन्या पेन्शनसाठी घेतलेला पुढाकार, वेगळी ताकद निर्माण करत आहे.
जुनी पेन्शन योजना लागू झाली नाहीतर आपण जर आमदार बनलोतर, आपणही पेन्शन घेणार नाही.. ही त्यांनी केलेली प्रतिज्ञा महत्वाची ठरत आहे!