देऊळघाटचा मेम्बर ठरला अपात्र! अवाजवी 'राज' कारण करणे भोवले

 
 बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जात पडताळणी समितीकडे सादर केलेले  अनुसूचित जमाती चे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांनी देऊळघाट ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरविले आहे. यामुळे राजकीय व सामाजिक दृष्ट्या अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देऊळघाट सह तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
इस्माईल खान मोहम्मद खान असे या  बहाद्दर व निवड रद्द करण्यात आलेल्या सदस्याचे नाव आहे. त्याने देऊळघाट ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक एसटी प्रवर्गाच्या जागेवर लढविताना  ' राज' या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अमरावती स्थित जात पडताळणी समितीकडे सादर केले होते. याप्रकरणी माजी सरपंच मुश्ताक अहमद,  गजनफर खान, जुनेदखान, आरीफखान यांनी समितीकडे तक्रार केली. समितीने इस्माईल खान याचा दावा अवैध ठरविल्याने  जिल्हाधिकारी यांनी त्यांची सदस्य पदी झालेली निवड रद्द ठरविली आहे.