दिल्ली डायरी: ७ ६५ वर्षांचा ' युवा योद्धा' ; ६ लढतीतील विजेता! फिटनेस आणि राज ठाकरेंना विरोध कायम!! नवी दिल्ली वरून बुलडाणा लाइव्ह साठी संजय मोहिते यांचा खास रिपोर्ट

 
नवी दिल्ली ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपाचे फायरब्रॅंड नेते खा.बृजभूषण शरणसिंह या ६५ वर्षांच्या ' युवा' नेत्याला उत्तर प्रदेशच काय अगदी  महाराष्ट्रात देखील परिचय करून देण्याची गरज नाय! मनसे नेते राज ठाकरे यांच्या अयोध्या वारीला जहाल भाषणे अन वक्तव्य करून जहाल विरोध करतानाच  त्यांना दौरा रद्द करण्यास भाग पाडणारा कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचा हा बेताज बादशहा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला! यामुळे राजधानी दिल्लीत येणाऱ्या महराष्ट्रवासीयांना देखील त्यांना भेटण्याची उत्सुकता असते. याला प्रस्तुत प्रतिनिधी देखील अपवाद कसा ठरणार? ...

 यामुळे राजधानी दिल्लीतील ३ दिवसांच्या मुक्कामाच्या अखेरच्या टप्प्यात आमचा सारथी रामशरणला ' रथ '  अशोका रोड वरील २१ क्रमांकाच्या कोठी वर न्यायला सांगितला तेंव्हा त्याने' उपरके ५० रुपये छोड दिया'  असे म्हणत मनाचा मोठेपणा दाखविला ! ( हा आमचा प्रभाव नव्हे तर खासदारांबद्धल असलेला आदर होता, हे आम्हाला अंमळ उशिरा कळलं) . दरम्यान  आपली गाडी बिघडल्याने आमच्या वाहनात लिफ्ट घेणाऱ्या कैसरगंज मधील  पदाधिकारी आणि पदवीधर व  तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करणाऱ्या चालकाचे राजकीय ज्ञान पण वाखाणण्यासारखे होते.  विशेषतः  खा. बृजभूषण यांचा राजकीय जीवनपट त्यांना पाठ होता.

त्यामुळे साकेत महाविद्यालयातील खा.  ब्रजभूषण यांची राजकीय जीवनाची सुरुवात करणारी छात्र संघाची निवडणूक, गन्ना समिती निवडणूक  ते १९९१ ते २०१९ दरम्यानच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ( व १९९६ मध्ये त्यांच्या अर्धांगिनी  केतकी सिंह यांनी ) मिळविलेल्या ६ विजयाची त्यानी माहिती दिली. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्षपद व त्यांनी तयार केलेले सातेक हजार पैलवान, राजा गौन्डा यांचे गुरुतुल्य राजकीय मार्गदर्शन यावर त्यानी प्रकाश टाकला.   कोठीवर पोहोचण्यापूर्वी त्यांनी प्रेमळ आग्रह करून चहा पाजला. त्यामुळे  हा शाब्दिक गौरव सोहळा चांगलाच लांबला.  जबतक माफी नही  तब तक राज  ठाकरे को अयोध्या की  झाकी नही ही  साब की भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
अन... घोर निराशा

 दरम्यान संध्याकाळी कोठी नं. २१ ला पोहोचलो.  परिसर व कार्यालय हाऊसफुल्ल होता. स्वीय सहाय्यक विमलकुमार यांना आत्मपरिचय करून देतानाच आम्ही सांसद चे फॅन आहोत असे सांगितल्यावर स्मित मुद्रेने 'बॅड न्यूज'  दिली. साहब अर्जंट कामसे संसदीय क्षेत्र मे गये है असे सांगून त्यांनी आमच्या उत्साहरूपी फुग्यातील हवाच काढली! त्यांचे संपर्क क्रमांक देऊन कोशिश करे, बात हो जायेगी असे सांगून आम्हाला दिलासा दिला. कार्यकर्ते, पदाधिकारी, व मतदारांनी गच्च परिसराचा निरोप घेतला तेव्हापासून  ते गंगासागर नांदेड एक्सप्रेस च्या एसी कोचने केलेला १६ तासांचा  प्रवास  संपवून मलकापुरात पोहोचले तेंव्हाही एका योध्याच्या  हुकलेल्या भेटीची खंत मनात कायम होती.  दिल्लीत आल्याबरोबर कव्हर केलेली राहून गांधींची काँग्रेस मुख्यालयातील  सभा ( जोरदार भौनी) , गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीने पार पडलेले सहकार अधिवेशन कव्हर केल्याने   जेवढा  जोश तयार झाला तेवढीच हूकलेली मुलाखत  निराश करणारी  होती . ही सल कैक दिवस राहणार हे नक्की...

( इति दिल्ली पुराणम)