शिवसैनिकांना गिन के आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचाय! दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देणार! बुलडाण्याच्या मेळाव्यात अंबादास दानवेंचा आ. संजय गायकवाडांवर हल्लाबोल
भाषणाची सुरुवात आ. दानवे यांनी कुणी गिनायला आले आहे का असे विचारून केली. कुणीतरी इथे येऊन आधी गिनुन घ्या, एखाद्याला चूनुन घ्या. तोच कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो, मग पाहतो कोण भारी ठरते ते असे आ. दानवे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू इथले आमदार कोंबत होते. आता तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात असा सवाल त्यांनी केला. सत्ता मिळविण्यासाठी, खुर्च्या मिळविण्यासाठी आम्ही शिवसेनेचे कामे केले नाही. आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेनेचे काम करीत आहोत. सत्ता येत जात असते,कायमची खुर्ची घेऊन कुणी आले नाही. आपल्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी राहिले नसले तरी त्यांना बनवणारे लोक मात्र आपल्यासोबत आहेत असेही आ. दानवे म्हणाले.
त्या अश्रूंची किंमत वसूल करायची...
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर माय माऊल्यांच्या डोळ्यात अश्रू होते.येणाऱ्या काळात या प्रत्येक अश्रूंची किंमत वसूल करायची आहे असे आ.दानवे म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्ष खराब करत आहे त्यांना आवरा असे आ. दानवे म्हणाले. इथले आमदार नगरपालिकेत बसून अनधिकृत कामे करतात. बुलडाण्यात वरली, मटका खुलेआम चालतो. बुलडाण्याच्या एसपी ऑफिसच्या बाजूला अवैध धंदे चालतात.पोलीस झोपले आहेत का? पोलीसांनो सत्ताधारी पक्षाच्या हाताखालच्या मांजर बनू नका असे आ. दानवे म्हणाले. बुलडाण्यात दादागिरी चालते पण शिवसैनिकानो घाबरु नका. दादागिरीला दादागिरी ने उत्तर देऊ असे आ. दानवे म्हणाले. राज्यातच दहशतवाद आहे म्हणून बुलडाण्यात दहशतवाद असेही ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रातून पळवून लावण्यात येत आहे असा आरोप आ. दानवे यांनी केला. आता जसे गद्दार आहेत तसेच शिवरायांच्या स्वराज्यातही होते. मात्र निष्ठावान मावळे स्मरणात राहतात.
योग्यवेळी ५० खोक्यांचे पुरावे समोर येतील.ज्यांनी दिले त्यांचेच लक्ष या खोक्यांवर आहे, तेच सांगतील असेही दानवे म्हणले. गद्दार आमदारांच्या डोक्यावरील गद्दारीचा टिळा पुसल्या जाणार नाही असेही ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाची तयारी करा, लोकसभेची तयारी करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बुलडाणा नगरपालिका माझीच ,माझ्याच पोराची असे कुणी स्वप्न पाहू नका असा टोलाही त्यांनी स्थानिक विरोधकांना लगावला.
गद्दारांचे हाल होतील...
जे गद्दार आमदार उद्धव ठाकरेंना सोडून भाजपकडे गेले त्यांचे हाल भाजपच करणार आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष बुलडाण्यात येऊन पुढचा खासदार भाजपचा असे बोलले आहेच याचाच अर्थ प्रतापरावांनी एकतर घरी बसावं नाहीतर भाजपत यावं असा असल्याचे आ. अंबादास दानवे म्हणाले.