काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी केली उद्धव ठाकरेंच्या सभास्थळाची पाहणी! खा. अरविंद सावंत म्हणाले ही सभा शिवसेनेची, महाविकास आघाडीची नाही..

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज,२६ नोव्हेंबरला चिखली येथे शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. शिवसेनेचे राज्यभरातील बडे नेते काल पासून चिखलीत दाखल झाले आहेत. दरम्यान खा. अरविंद सावंत यांनी ही सभा महविकास आघाडीची नसून शिवसेनेचे असल्याचे काल पत्रकारांशी बोलतांना म्हटले होते. मात्र आज, २६ नोव्हेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमारास उद्धव ठाकरेंची सभा स्थळाला काँगेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेनी भेट देऊन पाहणी केली.

    budhvat

       जाहिरात☝️

 चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. खा. अरविंद सावंत, खा.विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाळापुरचे आ. नितीन बापू देशमुख कालपासून चिखलीत तळ ठोकून आहेत. ४० आमदार आणि १३ खासदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विदर्भात येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दुपारी तीनला होणाऱ्या या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर ,जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले आहे.