कन्फर्म: झेडपी मध्ये ओबीसींच्या 17 च जागा ! आघाडीच्या दैनिकाने ठोकून दिला जुनाच आकडा!!
सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलैला दिलेल्या दिलासादायक निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये प्रामुख्याने मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या झेडपी मध्ये ओबीसींना किती जागा याबद्धल माध्यमे आणि प्रशासन याबद्धल संभ्रम असल्याने अंदाजित आकडे प्रसिद्ध झाले. एका कथित आघाडीच्या दैनिकाने तर 2017 च्या निवडणुकीतील 15 जागांचा आकडा प्रकाशित करून टाकला! यामुळे आज गुरुवारी सकाळी देखील हा संभ्रम कायम होता. मात्र आज निवडणूक यंत्रणांनी काथ्याकूट करून 68 सदस्यीय बुलडाणा जिल्हा परिषद मधील 17 च जागा ओबीसींसाठी राखीव राहणार असल्याचे स्पष्ट केले. सन 2017 च्या लढतीत 58 सदस्य संख्येच्या तुलनेत 15 जागा राखीव होत्या .
असे राहील आरक्षण
दरम्यान बुलडाणा जिल्हापरिषद मधील 17 जागा ओबीसी करिता आरक्षित राहणार आहे. अनुसूचित जातींसाठी 13 तर जमातीसाठी 4 जागा आरक्षित राहणार आहे. 34 जागा सर्वांसाठी खुल्या राहतील. 68 पैकी 34 जागा राखीव आणि 34 ओपन असे जागावाटप म्हणजे न्यायालयाने आखून दिलेल्या 50 टक्के मर्यादेत आरक्षणाची मर्यादा पाळणारे राहणार आहे.