बुलडाण्यात आ. संजय गायकवाड समर्थकाच्या घरावर हल्ला! आमदारपूत्र कुणाल गायकवाड म्हणाले, कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर गाठ आमच्याशी..! समोरचा कुणीही असुदेत..!
बुलडाणा तालुक्यातील मासरूळ - पांगरखेड येथे काल, मध्यरात्री एका गां× नेत्याच्या सांगण्यावरून ५ ते ६ शेळपटांनी खुन्नस मनात ठेवून संजय गायकवाड यांचे समर्थक राजाराम पिंपळे यांच्या घरावर हल्ला केल्याचे कुणाल गायकवाड यांनी सांगितले. राजाराम पिंपळे यांना जिवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. या घटनेमुळे पिंपळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे आज सकाळीच कुणाल गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह राजाराम पिंपळे यांच्या घरी पोहचून त्यांची विचारपूस केली.
आ. संजय गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांना जीवापाड जपतात. त्यामुळे यापुढे असे भ्याड कृत्य कुणी घडवून आणल्यास किंवा त्यामागे कोण आहे हे जर माहीत पडल्यास विचार करून घ्या काय होईल असे आव्हानच कुणाल गायकवाड यांनी दिले आहे. कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास समोरचा कुणीही असुदे जशास तसे उत्तर मिळेल..गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा असेही कुणाल गायकवाड म्हणाले .