आ. संजय रायमुलकर म्हणतात...अन्यथा पुढच्या निवडणुकीत तिकीट मागणार नाही ! लोकांना वाटत खा.जाधव आमच्यासोबत नाही, पण....!
सत्तेच्या पहिल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांना भेटता येत नव्हते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार नंबर दोन वर होता तिथे त्या उमेदवारांना मंत्र्यांकडून निधी उपलब्ध करुन दिल्या जात होता. शिवसेनेचे खच्चीकरण सुरू होते. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णय घेतला असे आ.रायमुलकर म्हणाले.
खा.प्रतापराव जाधव यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो. लोकांनां सध्या वाटतय की ते आमच्यासोबत नाही, ते नेमके कोणासोबत आहेत..मात्र लवकरच खा. जाधव योग्य तो निर्णय जाहीर करतील असेही आ. रायमुलकर यावेळी म्हणाले.सत्तेच्या आधीच्या अडीच वर्षात कामे होत नव्हती मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने उरलेल्या अडीच वर्षात मतदारसंघाचा विकास करायचा आहे. ज्या कामांचा शब्द जनतेला दिलाय ती कामे पूर्ण करू न शकल्यास पुन्हा निवडणुकीचे तिकीट मागणार नाही असेही आ. रायमुलकर म्हणाले.