गुलालाची उधळण व फटाक्याची आतीषबाजी! जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींचा असा लागला निकाल

 
h nb
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हयातील 5 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे निकाल आज 5 ऑगस्ट रोजी जाहीर झाले असून निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी करुन हजारो समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.

खामगाव तालुक्यातील दोन तर मलकापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी उत्साही मतदानाची नोंद झाली होती. आज संबधीत तहसिल कार्यालयात सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होवून निकाल जाहीर करण्यात आले. या चुरशीच्या लढतीतील विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. मलकापूर तालुका आळंद ग्रामपंचायत : ईश्वर खापोटे, उषा वराडे, रुख्मीनी गावंडे, अनिल निकम, वंदना भगत, अक्षय भगत, उज्वला खापोटे. उमाळी ग्रामपंचायत : किशोर धोरण, कोमल राऊत, पुष्पा राऊत, बाबुसिंग चव्हाण, भिमाबाई गवई, सरला बोपले, शे. गुलाम हुसेन, संघमिञा इंगळे, प्रणिता निबोळकर, विवेक निखाडे, कविता धोरण. बेलाड ग्रामपंचायत : सागर संबारे, दिपमाला इंगळे, प्रिया काटे, संदिप निंबोळकर, इच्छाराम संभारे, दुर्गा संभारे, मायावती इंगळे, सचिन संभारे, प्रतिभा इंगळे. 

 खामगाव तालुका : खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत : शे. महोम्मद नदीम, शे. सलमा बानो, अविनाश इंगळे, हर्षा दाते, योगिता अनासणे, सुरेश गुजर, सुनंदा राठोड. पिंप्री धंदर ग्रामपंचायत : प्रमोद चव्हाण, बेबी जाधव, रंजना राठोड, विष्णू चव्हाण, ममता राठोड, सुनिल वानखडे, संगिता राठोड.