बुलडाणा शहराला पोलीस छावणीचे स्वरूप! चहूबाजूंनी तगडा बंदोबस्त! शिवसेनेच्या कार्यक्रमात पोलिसांच्या परवानगी शिवाय प्रवेश नाहीच! जुना इतिहास लक्षात घेऊन पोलिसांची खबरदारी

 
polis
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य जिल्हा मेळावा आज बुलडाणा शहरात पार पडत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून या मेळाव्यासाठी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

आ. संजय गायकवाड यांनी याआधी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात धुडघुस घालता होता.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यांनंतर आ. संजय गायकवाड यांनी चून चून ने मारेंगे असे आक्रमक विधान करून ठाकरे गटाला इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा हा भव्य मेळावा होत असल्याने आता पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे.

१ उपविभागीय पोलिस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे १७ अधिकारी ९० पोलीस कर्मचारी आणि दंगाकाबू पथक कार्यक्रम स्थळी तैनात करण्यात आले आहे. गर्दे सभागृहात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांच्या  तपासणीशिवाय आतमध्ये कुणालाही  प्रवेश करता येणार नाही.