ब्रेकिंग! सव्वा वर्षानंतर 'या' ४ गावांना मिळणार सरपंच!! आता सदस्यांना 'खुला' चान्स; २९ ला निवडणूक

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विविध कारणांसह न्यायालयीन लढ्यामुळे सरपंच पदाची निवड रखडलेल्या जिल्ह्यातील ४ गावांना आता गावाचा कारभारी मिळणार हाय! येत्या २९ एप्रिलच्या मुहूर्तावर  यासाठी निवडणूक होणार असून चारही ठिकाणचे आरक्षण आता ' खुले' झाल्याने या मानाच्या पदासाठी प्रचंड चुरस राहणार हे उघड आहे

 निवडणुकीचा वाद न्यायमंदिरात गेल्याने जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड मागील एक ते दीड वर्षांपासून रखडली होती . यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील डोणगाव, शेलगाव देशमुख( ता. मेहकर) , खेर्डी( ता. शेगाव) , कुंवरदेव( ता. जळगाव जामोद) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आता अडथळ्यांची शर्यत पार करून सरपंच पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झालाय! ही निवडणूक न्यायालयाच्या अधीन राहून पार पडणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले. 

सोडतमध्ये ओबीसी, संधी मात्र सर्वांना!
दरम्यान चारही ठिकाणचे आरक्षण ओबीसी असे निघाले होते. मात्र हे आरक्षण बदलले असून आता ते सर्वसाधारण म्हणजे सर्वांसाठी 'ओपन' ठरले आहे. यामुळे चारही ठिकाणी प्रामुख्याने डोणगाव मध्ये काट्याची लढत होण्याची दाट शक्यता आहे.