मोठी बातमी! खा. प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी! सात बंडखोरांविरुद्धही कारवाई!! शिवसेना जिल्हा प्रमुखपदी "ह्या" निष्ठावान सैनिकाची वर्णी!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांचेसह  सात  बंड खोर पदाधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये या कारवाईचे वृत्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आले आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे . खा. जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तर  जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांची पक्ष विरोधी कारवाया बद्धल शिवसेनेतुन हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्तात नमूद आहे . दाणे यांच्या जागी वसंतराव भोजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.